आज ‘फादर्स डे’! ‘अशा’ शुभेच्छा द्या तुमच्या वडिलांना …

0
5

ज्या व्यक्तीचा हात पाठीवर असल्यावर कशाचीही भीती नसते, असा व्यक्ती म्हणजे वडील… यंदा 16 जून रोजी फादर्स डे साजरा केला जातोय. वडील आणि मुलामधील अनमोल नात्याला आणखी घट्ट करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. आज तुम्हालाही वडिलांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही खालील मेसेज पाठवून वडिलांना खास शुभेच्छा (Father’s Day 2024 Wishes In Marathi) देऊ शकता.

 

फादर्स डे शुभेच्छा संदेश (Father’s Day Wishes In Marathi)

 1. जगाच्या गर्दीत माझ्या,

सर्वात जवळ तुम्ही आहात,

माझे वडील, माझे देव

माझे नशीब तु्म्ही आहेत

फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा बाबा!

 

 1. कधी कठोर, तर कधी मायाळू,

कधी दमदाटी करणारे तर कधी अलगद डोक्यावरून हात फिरवणारे,

परिस्थितीनुसार वागायला शिकवणारे आणि आमचे सगळे लाड पुरविणाऱ्या पप्पांना ‘फादर्स डे’ च्या हार्दिक शुभेच्छा!

 

 1. कधी शांत, कधी रागीट

कधी प्रेमळ, कधी वात्सल्य

कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या

लाडक्यांना पप्पांना

फादर्स डेच्या मन भरुन शुभेच्छा!

 

 1. खिसा रिकामा असूनही

त्यांनी कधी नकार दिला नाही

माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती

मी कधी पाहिला नाही

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

 1. तु म्हणजे जीवनाच आधार,

तुच माझ्या जीवनाचा शिल्पकार,

तु माझ्या आयुष्यातील प्रेम,

माझ्या लाडक्या बाबाला फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा!

 

 1. प्रत्येक खुशी, प्रत्येक क्षण सार्थ असतो

जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो

फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा!

 

 1. आयुष्य खूप मोठं असलं

तरी चिंता खूप आहेत

पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे

म्हणूनच ते सहन करण्याची शक्ती मिळत आहे

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

 1. बाप म्हणजे कोण असतं?

हरवलेल्या पाखराचं छत्र

अन् बिथरलेल्या आवाजाचं पत्रं असतं….

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

 1. वडिलांसाठी दिवस नसतो

तर आयुष्यातील प्रत्येक दिवस वडिलांमुळेच असतो

हॅप्पी फादर्स डे बाबा!

 

 1. तुम्ही दिलेला वेळ

तु्म्ही घेतलेली काळजी

आणि तुम्ही दिलेलं प्रेम

याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही

फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा!

 

 1. बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून

मुलांसाठी झटणारं अंतःकरण

फादर्स डेच्या शुभेच्छा!

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here