माणदेश एक्स्प्रेस न्यूज
आटपाडी : विधानसभेच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आटपाडी-खानापूर राजकारणात मोठा ट्विस्ट झाला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी अर्ज माघारी घेतला आहे.
अर्ज माघारी घेणारे उमेदवार
1. दादासो पोपट घाडगे 2. सुहास राजेंद्र बाबर 3. वैभव प्रतापराव पाटील 4. अमोल अनिलराव बाबर 5. प्रकाश आबासो गायकवाड 6. सचिन दिलीप गुरव 7. सदाशिवराव हनमंतराव पाटील 8. मोहन सोनू बागल 9. डॉ उन्मेष गणपतराव देशमुख 10. संदीप गंगाधर लोंढे 11. ब्रम्हदेव कुंडलिक पडळकर 12. गणेश तुकाराम जुगदर 13. महादेव उत्तम साळुंखे 14. रणजित सर्जेराव पवार यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे.
आटपाडी तालुक्यातून राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आपल्या उमेदवारी अर्ज ठेवत आपली उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे येत्या काळात वैभव पाटील सुहास बाबर व राजेंद्रआण्णा देशमुख यांच्यात चुरशीची लढत होणार हे निश्चित झाले आहे.
तर ब्रह्मानंद पडळकर कुणाला पाठिंबा देणार त्याचे लक्ष आटपाडी तालुक्याला लागले असून आटपाडीच्या अस्मितेसाठी राजेंद्रआण्णा देशमुख यांना पाठिंबा देणार का? याची आटपाडी तालुक्यात जोरदार चर्चा रंगत आहे.