ताज्या बातम्याक्रीडा

‘या’ क्रिकेटर ने पटकावला ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार

आयसीसीने अमेरिकेत कोहलीला आयसीसी 'वनडे प्लेयर ऑफ द मॅच 2023' या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोहलीला हा पुरस्कार गेल्या वर्षीच जाहीर होता, मात्र आता त्याला अमेरिकेत या पुरस्काराची ट्रॉफी प्रदान करण्यात आली

 

भारताचा माजी कर्णधार तसेच स्टार खेळाडू विराट कोहलीला आयसीसी ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच’ २०२३चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विराटला ही मानाची कॅप न्यूयॉर्कमध्ये देण्यात आली. टी-२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतीय संघ अमेरिकेत उपस्थित आहे. कोहली या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून संघाला त्याच्याकडून उत्कृष्ट खेळीची अपेक्षा आहे. कोहलीही या स्पर्धेत खेळण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघात सामील झाला आहे.
आयसीसीने अमेरिकेत कोहलीला आयसीसी ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच 2023’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोहलीला हा पुरस्कार गेल्या वर्षीच जाहीर होता, मात्र आता त्याला अमेरिकेत या पुरस्काराची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. आयसीसीने पुरस्कारासोबतचा कोहलीचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर विराटला शुभेच्छा देत आहे.

विराट कोहलीने 2023 मध्ये आपल्या बॅटने शानदार प्रदर्शन केले होते. विराटने 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 शतके आणि 8 अर्धशतकांसह एकूण 1377 धावा केल्या होत्या. 2023 मध्ये कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 166 धावा होती. एवढेच नाही तर कोहलीने एकदिवसीय विश्वचषकात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. विराटने एकदिवसीय विश्वचषकाच्या 11 सामन्यात 765 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याच्या नावावर 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. आता कोहली टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी अमेरिकेत आला आहे. कोहली टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. अशा परिस्थितीत या विश्वचषकातही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

पहा पोस्ट :

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button