आंबेवाडीत चोरी करताना चोरट्यास पडकले ; तीन मोटारसायकली जप्त

0
4883

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. यावेळी चोरट्यांनी आंबेवाडी, पिंपरी खुर्द येथे अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या. यावेळी नागरिकांनी चोरट्यांचा माग काढत एका चोरट्याला पकडले. तर चौघे चोरते फरार झाले. यावेळी एका चोरट्याला पोलीसांच्या ताब्यात दिले. यावेळी चोरट्याकडून पोलिसांनी तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

आंबेवाडी येथील फुलाबाई आलदर यांच्या घर बंद होते. यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी शेजारी राहणाऱ्या लोकांना बंद घरात हालचाल जाणवल्याने शांतपणे इतर वीस ते पंचवीस ग्रामस्थ एकत्र आले व चोर शिरलेल्या घरात गेले असता रोहित पवार हा रंगेहाथ सापडला तर एक जण पळून गेला. यावेळी ग्रामस्थांनी चोप दिला असता त्याने चार जण असल्याचे सांगत दोघे इतर ठिकाणी चोरी करण्यास गेले असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांनी माहिती कळवली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरटा रोहित पवार यास पोलिसांच्या हवाली केले. यावेळी चोरट्याकडून एमएच१०ईडी६८०७, एमएच११सी झेड ९८६८, एमएच११ बीएम८७९७ या नंबरच्या तीन मोटारसायकल सापडल्या आहेत. याबाबत फुलाबाई भगवान आलदर रा.आंबेवाडी यांनी आटपाडी पोलिसात तक्रार दिली आहे. एकूण ५७ हजार रुपयांचा सोने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here