‘बिग बॉस मराठी’च्या या सिझनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणचा साधेपणा लोकांना भावतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणपती विशेष भागात सूरजने केलेली कृतीने प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. सध्या गणेशोत्सवानिमित्त ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकांना उकडीचे मोदक देण्यात आले. यावेळी सगळ्यांनीची मोद खाल्ले. सूरजला मोदक देण्यात आला, तेव्हा एक मोदक गणपती बाप्पाला दिला तर चालेल का? असं सूरज म्हणतो. त्यावर चालेल की…, असं कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुख म्हणतो. हा व्हीडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे.
सूरज चव्हाणने स्वत: मोदक खाण्याआधी गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून ठेवला. त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. नेटकऱ्यांनी सूरजचं कौतुक केलं आहे. एकच मन आहे… किती वेळा जिंकणार भावा… फुल्ल सपोर्ट सूरज, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. मोदकाचा पहिला मान हा गणपती बाप्पाचां आहे हे सूरज चव्हाण दाखवून दिलं.. बाकीच्यांनी आधी मोदक खाल्ले. त्यामुळेच आम्ही सूरजचे कट्टर फॅन आहोत.., अशी कमेंट सूरजच्या चाहत्याने केली आहे.
महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापून हा महाराष्ट्र घडवून दिला. त्याच्यामुळे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि सुरजनेचे गणपती बाप्पांना मदत दिला. गणपती बाप्पा सुरज भाऊ तुझ्या मनोकामना पूर्ण करू गणपती बाप्पा मोरया…, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. बाकीच्यांनी फक्त नाटक केली घरचा गणपती मिस करत आहे म्हणून….सूरज नी तर मन जिंकलं …. फुल सपोर्ट भावा तुलाच, अशीही कमेंट सूरजच्या या व्हीडिओवर नेटकऱ्यांनी केलीय.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात घरात संग्राम चौगुलेने एन्ट्री केली आहे. पण त्यावेळी सूरज मात्र त्याच्या अपेक्षांबद्दल बोलताना दिसून आला. वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला घरात एक मुलगी यायला हवी आहे. त्यामुळे घरातील सदस्य त्याची चांगलीच खेचखेची करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात वैभव अंकिताला म्हणतोय की सूरज बोलतोय, कोणीतरी मुलगी आली तर मजाच आहे! त्यावर अंकिता सूरजची मजा घेताना दिसते. तू चुकीचा गेम समजत आहेस..थंड घे, असं अंकिता म्हणाली. त्यावर निक्की मात्र सूरजला पाठिंबा देते.
पहा व्हिडीओ:
instagram.com/reel/C_rrk9HvdHW