दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्यांदा ICC वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. भारताविरुद्ध T20 वर्ल्ड कपची फायनल जिंकून 32 वर्षापूर्वी बसलेला चोकर्सचा शिक्का पुसण्याची संधी होती. सूर्यकुमार यादवने या सामन्यात मोक्याच्या क्षणी ऐतिहासिक कॅच पकडून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं. सूर्याने पकडलेल्या या कॅचवरुन आता काही जण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. सूर्यकुमार यादवचा पाय बाऊंड्रीच्या रशीला लागल्याच काही जणांच म्हणण आहे. काही नेटीझन्सनी आयसीसीच्या नियमांचा हवाला देऊन हा सिक्स असल्याच म्हटलं आहे.
T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला 16 धावा करण्यापासून रोखायच होतं. या कामासाठी हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर क्रीजवर होता. हार्दिकच्या पहिल्याच चेंडूवर मिलर मोठा फटका खेळला. सिक्सच्या या चेंडूला सूर्याने आपल्या जबरदस्त फिल्डिंगच्या जोरावर कॅचमध्ये बदललं. पण हा सिक्स होता, असं काही जणांच म्हणणं आहे. अंपायरने घाई गडबडीत चुकीचा निर्णय दिला, असं काही चाहत्यांच म्हणणं आहे. त्यांनी हा व्हिडिओ झूम करुन शेअर केलाय. त्याचा पाय बाऊंड्रीच्या रोपला लागल्याचा त्यांचा दावा आहे. काही फॅन्सनी बाऊंड्रीचा नियम समजावून हा सिक्स असल्याच म्हटलय.
त्या कॅचवेळी काय घडलं?
T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये लास्ट ओव्हरचा पहिला चेंडू हार्दिक पांड्याने फुलटॉस टाकला. स्ट्राइकवर असलेल्या मिलरने त्यावर हवेत फटका मारला. बाऊंड्रीपार चेंडू जाणार असं वाटलं. दबावाच्या त्या क्षणांमध्ये सूर्युकमारने जबरदस्त कॅच पकडली. सगळेच जण त्यामुळे हैराण झाले. कॅच पकडल्यानंतर त्याने बाऊंड्री लाइन ओलांडली. पण त्याआधी त्याने चेंडू हवेत उडवला. त्यानंतर त्याने पुन्हा मैदानात येऊन कॅच पकडली.