‘या’ अभिनेत्रीने ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटाच्या सेटवर मारली होती सलमान खानच्या कानशीलात

0
382

आजही चाहत्यांना बॉलिवूड अभिनेता सलमान खान चा चित्रपट ‘हम आपके है कौन’ पाहायला आवडतो. या चित्रपटात सलमान खानसोबत माधुरी दीक्षितही मुख्य भूमिकेत दिसली होती. अलीकडेच, सलमान खानची सहकलाकार हिमानी शिवपुरी हिने तिचा चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला. अभिनेत्रीने सांगितले की, सलमान खान सेटवर खूप खोडकर होता आणि एकदा त्याने असे काहीतरी केले ज्यामुळे हिमानीने सलमान खानला सर्वांसमोर थप्पड मारली.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत हिमानीने हम आपके है कौन या चित्रपटाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा शेअर केला. अभिनेत्री म्हणाली, ‘मी रंगभूमीशी निगडीत आहे. त्यामुळे जेव्हा मी सलमानला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला आठवते की सूरज बडजात्याने आम्हाला एक सीन समजावून सांगितला होता, जो आम्ही दोघेही करायला तयार होतो.’

हिमानी यांनी पुढे सांगितलं की, आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करताच सलमान खानने मला चाची जान म्हटले आणि त्यानंतर त्याने मला अचानक आपल्या मांडीवर घेतले, त्यानंतर मी त्याला कानशीलात मारली. हे सर्व पाहून सूरजलाही आश्चर्य वाटले. परंतु, नंतर तो क्षण सूरजने चित्रपटात ठेवला.’

याशिवाय, हिमानीने सलमान खानच्या स्वभावाबद्दल बोलताना त्याची खूप प्रशंसा केली. अभिनेत्री म्हणाली की, त्याच्यासोबत काम करणे खूप छान होते. तो चित्रपटाच्या सेटवर घरून जेवण, बिर्याणी असं सर्व काही आणत असे. हम आपके है कौन च्या सेटवर ते फक्त शाकाहारी जेवण देत असतं. त्यामुळे सलमान ईदला बिर्याणी आणायचा आणि आम्ही सगळे ती खायचो. सलमान खूप खोडकर होता, असंही यावेळी हिमानीने नमूद केलं.

हिमानी शिवपुरी आणि सलमान खान यांची मैत्री या चित्रपटापलीकडेही कायम राहिली. त्यांनी आम्ही साथ साथ है आणि बीवी नंबर 1 सारख्या इतर यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ज्यामुळे त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here