ताज्या बातम्यामनोरंजन

धडक २ चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार; ‘हे’ दोन लोकप्रिय कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत    

धडक चित्रपटानंतर नंतर धडक 2 चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी धडक 2 चित्रपटाबाबत चर्चा सुरु होती. निर्माता करण जोहर याने या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटामध्ये सिध्दांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अॅनिलम चित्रपटामुळे तुप्ती डिमरी भुमिकेसाठी चर्चेत राहिली होती. सिध्दांत आणि तृप्तीची जोडी पहिलांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. चित्रपटात प्रेम कथा, रोमॅंटिक ड्रामा असणार आहे. हेही वाचा- कॉमेडी चित्रपट ‘होय महाराजा’चा ट्रेलर रिलीज, प्रथमेश परब, अभिजीत चव्हाण आणि संदिप पाठक प्रमुख भूमिकेत

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरु होणार आहे. झी स्टुडिओ, धर्मा प्रॉडक्शन आणि  क्लाउड या चित्रपटांची निर्मीती करणार आहे. सिनेमाची घोषणा करत सोशल मीडियावर एक टीझर शेअर केला आहे. टीझर पाहून प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. धडक चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालेला होता. 6 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच पुन्हा प्रेम कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. परंतु ही प्रेम कथा जातीमुळे अधुरी राहणार. धडक २ पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. धडक हा सिनेमा मराठी चित्रपट सैराट याचा हिंदी रिमेक बनवला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button