
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून प्राण्यांना क्रूरतेची वागणूक दिली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एकाने उंट त्याच्या शेतात चरताना आढळल्याने रागाच्या भरात उंटाचा पुढचा पाय कापला निर्लज्जपणाचा कळस म्बणून की काय त्या वृद्धाने त्या घटनेचा व्हिडीओ ही रेकॉर्ड केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच. प्राणी प्रेमींनी निषेध नोंदवला.
दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी केला. त्यावर पाकिस्तानी नेत्या शाझिया अट्टा मारी यांनी प्रतिक्रीया देत, उंटाचा पाय कापण्यात सहभागी असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. असे स्पष्टीकरण दिले. पुढे त्या म्हणाली की आरोपी आणि उंटाचा मालक यांच्यात हे प्रकरण मिटले होते. परंतु ते मानवतेला अस्वीकार्य होते, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ:
https://twitter.com/HumaaaNawazKhan/status/1801919935980945547