TV, मोबाईल पाहता-पाहता झोपण्याची सवय पडेल महागात, होऊ शकतो आजार, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

0
348

गेल्या काही वर्षांमध्ये टीव्ही आणि मोबाईल माणसासाठी सर्वकाही झालं आहे. अनेक मबत्त्वाच्या कामांसाठी मोबाईल, न्यूज पाहण्यासाठी टीव्हीची गजर भासते. पण हीच गरज सवयीत बदलल्यानंतर त्याचा प्रचंड वाईट परिणार आरोग्यावर होतो. आता प्रत्येक जण वेग-वेगळ्या सीरिजच्या प्रेमात आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध थाटणीचे सिनेमे आणि सीरिज उपलब्ध आहेत. सांगायचं झालं तर, कोविड – 19 पासून जगभरात ओटीटी धारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लोकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्मचं व्यसन लागलं आहे. ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही. टीव्ही, मोबाईल पाहता – पाहता लोकं झोपतात. ज्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो.

टीव्ही, मोबाईल पाहता – पाहता झोप येण्याचे देखील अनेक वाईट परिणाम आहेत. संशोधनात असे म्हटले आहे की, या सवयीमुळे आपल्या झोपण्याच्या पद्धतीमध्ये व्यत्यय येतो ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. सांगायचं झालं तर 2022 मध्ये एक रिसर्च करण्याता आला होता. शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये रिसर्च पूर्ण करण्यात आला होता.

रिसर्चमध्ये सुमारे 550 लोकांचा समावेश होता, ज्यांचे वय 63 ते 84 वर्षे होतं. 550 लोकांना नित्यक्रम पाळण्याचा सल्ला देण्यात आला होता. शिवाय त्यांच्यावर लक्ष देखील ठेवण्यात आलं. अभ्यासानुसार, टीव्ही, मोबाईल पाहता – पाहता झोपण्याच्या सवयीमुळे शरीरात लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

रिसर्चनुसार, जे लोक टीव्हीच्या प्रकाशात झोपत होते त्यांच्यामध्ये इन्सुलिनची पातळी बिघडली होती. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा लोकांमध्ये धुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. एवढंच नाही तर, बीपी, शुगर आणि लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढतो…

स्लीपिंग डिसऑर्डरचे तोटे : तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही सतत कमी झोप घेत असाल किंवा स्क्रीनवर जास्त वेळ घालवला तर त्याचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. मानसिक आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडल्यामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडू लागतं. म्हणून अनेक समस्या डोकं वर काढतात.

तरुणांना होतं नुकसान : अनेक तरुणांमध्ये ही सवय. आहे. तरुण रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल घेतात आणि वेळ कसा निघून जातो तरुणांना कळत नाही. अशात तरुणांची झोप कमी होते. म्हणून स्नायू दुखणे किंवा इतर स्नायू संबंधित समस्या असू शकतात.

कशी सुधाराल तुमची सवय?
रोज किमान सात ते आठ तासांची झोप पूर्ण करा. मेडिटेशनची स्वतःला सवय लावून घ्या. काम असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करा. वेग-वेगळ्या विषयांवर आधारित पुस्तकं वाचण्यावर भर द्या. ज्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. योग्य आहार आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here