बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट, थेट दिल्लीत पडसाद, राष्ट्रीय बालक आयोगाने दखल घेतली

0
380

 

बदलापुरात दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय बालक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून एक पथक बदलापूरला पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने सांगितले आहे.

राष्ट्रीय बाल हक्क आयोग काय म्हणाले?
बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. केंद्र सरकारने निर्मित केलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी आयोगाकडून एक तपास पथक बदलापूर येथे पाठवण्यात येणार आहे. हे पथक या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करेल. तसेच पोलिसांनी पीडितेच्या पालकांना तक्रार नोंदवण्यासाठी 12 तास थांबवले, ही धक्कादायक बाब आगहे. याप्रकरणी राज्य शासनाकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे.

तसेच राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून पाठवण्यात येणाऱ्या या समितीवर माझेही लक्ष असेल. तसेच याप्रकरणी सहभागी असलेल्या सर्व दोषी पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा होईल. त्यासोबतच याप्रकरणाची सखोल चौकशी आम्ही देखील करणार असल्याची माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे.

नेमंक काय घडलं?
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या प्रकरणानतंर पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर तक्रार नोंदवण्यात आली.

यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली. अक्षय शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. तो 24 वर्षांचा असून या शाळेतील सफाई कर्मचारी म्हणून तो काम करत होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here