इवल्याशा बदकाचे अफलातून डावपेच! वाघाच्या हल्ल्यावर बदकाची भन्नाट चाल; असा डाव लढवला की Video पाहून तुम्हीही शाबासकी द्याल!

0
330

Duck Vs Tiger Video: वाघ जंगलाचा राजा, वजनात भारी आणि ताकदीनं अजोड. त्याच्या डोळ्यांची झपाटलेली नजर, कानांचं अचूक ऐकणं आणि नाकाची कमाल वास घेण्याची क्षमता… हे सगळं मिळून त्याला बनवतं एक असा शिकारी, ज्याच्यासमोर कुणीही थांबत नाही. मोठमोठे प्राणीही वाघाच्या एका हल्ल्यात जमिनीवर कोसळतात. पण… जर वाघासमोर एखादा छोटासा पक्षी उभा ठाकला आणि त्यालाच हैराण करून टाकलं तर? हो, ही गोष्ट ऐकायला जितकी अजब वाटते, तितकीच खरी आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक साधंसं दिसणारं बदक थेट वाघाशी भिडतं आणि आपल्या चपळाईनं असा खेळ करून जातं की, वाघ स्वतःच गोंधळून जातो.

 

जंगलामधील भयंकर शिकार्‍यांचा उल्लेख निघाला की सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येतात वाघ, सिंह आणि चित्त्यासारखे बलाढ्य प्राणी. हे असे शिकारी आहेत की क्षणार्धात शिकार उडवण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असतं. मात्र जर असं म्हणाल की, एका छोट्याशा बदकानं थेट वाघालाच चकवून सोडलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे.
सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट आणि थरारक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका छोट्याशा बदकाने जंगलातील बलाढ्य शिकारी वाघाला पाण्यातच खेळवून सोडलं. व्हिडीओमध्ये दिसतं की, वाघ अत्यंत सावधपणे बदकाच्या दिशेने जातो. त्याचा हेतू स्पष्ट असतो, बदक म्हणजे आजचा नाश्ता! पण, बदक काही साधा नाही. त्याला वाघाच्या इराद्याची आधीच कल्पना असते.

 

वाघ जसजसा जवळ येतो, तसतसा बदक आपल्या कौशल्याने एकदम पाण्यात डुबकी घेतो आणि काही क्षणातच दुसऱ्या टोकाला पोहचतो. वाघ पुन्हा तो दिसतो का म्हणून दुसऱ्या दिशेने जातो, पण बदक पुन्हा डुबकी मारून गायब होते. हे दृश्य एखाद्या लुका-छपीच्या खेळासारखं वाटतं, जिथे वाघ दरवेळी हरतो आणि बदक यशस्वीपणे बचाव करतो. वाघाने अनेकवेळा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, या बदकाने चपळाईने स्वतःचा बचाव केला आणि वाघाला खूप हैराण केले.

 

आतापर्यंत हजारो लोकांनी याला लाईक केलं असून लाखो लोकांनी तो पाहिलाही आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. कोणी लिहिलं, “पाणी हीच खरी ताकद आहे”, तर काहींनी बदकाच्या चपळाईचं कौतुक केलं आहे.
या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते प्रत्येक प्राणी आपल्या नैसर्गिक ताकदीने सुसज्ज असतो आणि वेळ आली तर तो त्याचा योग्य वापर करून बलाढ्य शत्रूलाही चकवू शकतो. बदकानं हेच करून दाखवलं.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here