बनावट सोन्याची तस्करी करण्यासाठी आरोपीने घरातच बांधला होता बोगदा

0
364

पश्चिम बंगाल पोलिसांनी बनावट सोन्याच्या मूर्तींशी संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कुलताली येथील आरोपीच्या घरात एक गुप्त बोगदा सापडला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, हा बोगदा काँक्रीटचा बनलेला आहे आणि त्याचे एक टोक आरोपी सद्दाम सरदारच्या घराच्या भूमिगत खोलीत उघडते, तर दुसरे टोक घराच्या मागे वाहणाऱ्या कालव्याला जोडलेले आहे. हा कालवा सुंदरबनमध्ये वाहणाऱ्या मातला नदीला जोडतो, ज्याच्या पलीकडे भारत- बांग्लादेशशी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. “सद्दाम आणि त्याचा भाऊ सैरुल हे अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहेत आणि पोलिसांच्या छाप्यांदरम्यान त्यांना पळून जाता यावे यासाठी हा बोगदा त्यांच्या घरात बांधण्यात आल्याचा संशय आहे,” असे बरुईपूर पोलिस जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी असेही सांगितले की, “तो त्याच्याकडचे सोन्याचे बार आणि मूर्ती स्वस्तात विकायच्या आहेत असे सांगून संभाव्य खरेदीदारांना आमिष दाखवायचा. तो त्यांना सोन्याच्या बनावट वस्तू दाखवायचा. खरेदीदार आल्यावर सद्दाम त्यांना एका निर्जनस्थळी घेऊन जायचा. तसेच त्यांच्यावर हल्ला करायचा  आणि त्यांचे सर्व सामान हिसकावून घ्यायचा.” सोमवारी पोलिसांनी सद्दामला नादिया जिल्ह्यातील एका व्यक्तीला बनावट सोन्याची मूर्ती दाखवून १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. मात्र, जमावाने पोलिस पथकावर हल्ला करून सद्दामची सुटका केली. पोलिसांना घाबरवण्यासाठी दंगलखोरांनीही गोळीबार केल्याचा आरोप आहे.

 

जमावाच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. सद्दाम आणि त्याचा भाऊ सैरुल सध्या फरार आहेत. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सद्दामची पत्नी मसुदा आणि सैरुलची पत्नी राबिया यांना अटक केली आहे. संध्याकाळी सद्दामच्या घराची झडती घेण्यासाठी पोलिसांचे मोठे पथक गावात पोहोचले. तेव्हा त्यांना हा बोगदा सापडला.

स्थानिक रबिउल लस्कर म्हणाले, “फिकट हिरव्या, निळ्या आणि जांभळ्या रंगात रंगवलेल्या एकमजली घराचा बाह्य भाग अतिशय सामान्य दिसतो आणि परिसरातील इतर घरांसारखा आहे. पण जेव्हा पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना एक भूमिगत खोली दिसली. तिथे एक पलंग होता, त्याखाली एक बोगदा होता.”

विटा आणि काँक्रीटचा हा बोगदा किमान आठ ते दहा फूट खोल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो  20 ते 30 फूट लांब, किमान पाच ते सहा फूट उंच आणि चार ते पाच फूट रुंद होते. त्यात लोखंडी जाळीचा छोटा दरवाजाही होता. बोगदा कंबरेपर्यंत पाण्याने भरलेला होता.

 

“तपास सुरू आहे. सद्दाम फरार आहे. बोगदा काही वर्षे जुना असल्याचे दिसते,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. खोलीच्या आत असलेल्या बोगद्याचे तोंड दोन ते तीन फूट रुंद होते. खाली उतरल्यावर एक छोटा लोखंडी गेट आहे. तो कालव्याला जोडलेल्या मुख्य बोगद्यात उघडतो.

 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, “एकदा व्यक्ती घराच्या मागील टोकापासून कालव्याचा वापर करून बाहेर पडली की, तो मताळा नदीपर्यंत पोहोचण्यासाठी बोटीचा वापर करू शकतो आणि सुंदरबन डेल्टामधील असंख्य कालवे आणि नद्यांचा वापर करून इतरत्र पोहोचू शकतो. तसेच पळून जाऊ शकतो.”

पाहा व्हिडीओ: