‘त्या’ रस्ते कामाचा आटपाडी नगरपंचायतीशी संबंध नाही : वैभव हजारे

0
636

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातून जाणारा पोलीस स्टेशन-सांगोला चौक- बस स्थानक मार्गे साई मंदिर चौक पर्यंतचा मुख्य रस्ता हा राज्यमार्ग आहे. पोलीस स्टेशन- सांगोला चौक- बस स्थानक मार्गे साई मंदिर चौक पर्यंत रस्त्याचे काम हे दि.१०/०१/२०२४ रोजीच्या नगरविकास विभागाकडील शासन निर्णयान्वये वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेले आहे.

 

शासन निर्णयानुसार कार्यान्वयन यंत्रणा ही सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. सदरच्या कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता ही सार्वजनिक बांधकाम विभाग आटपाडी यांचेमार्फत घेण्यात आलेले आहे. रस्त्याच्या बाजूस असलेले गटर/ड्रेनेज हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेमार्फत करण्यात येणार आहे.

 

सदर रस्त्याचे संपूर्ण सर्वेक्षण व त्याबाबतच्या सर्व रस्त्याच्या कामाबाबत अंदाजपत्रके, लाईनआउट व रस्त्याची मालकी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. नगरपंचायतीमार्फत पाणीपुरवठ्याची पाईपलाईन त्यांनी केलेल्या मार्किंग नुसार करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे संपूर्ण कामकाज सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असल्याने नगरपंचायतीचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचे नगरपंचायतीचे सीओ वैभव हजारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.