भयानक!कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरूणीवर सामूहिक अत्याचार

0
512

राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होतानाच दिसत असून कायद्या धाक उरला नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याचदरम्यान नालासोपारा येथे अत्याचाराच्या दोन भयानक घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत एका 22 वर्षांच्या तरूणीवर सामूहिक अत्याचार झाला असून याप्रकरणी भाजपाच्या नेत्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. तर दुसऱ्या घटनेत एका डेंटिस्टने अल्पवयीन मुलीच्या असाहय्यतेचा फयादा घेऊन तब्बल चार वर्ष तिच्यावर अत्याचारल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून या घटनांमुळे संतापाचे वातावरण आहे.

कोल्डड्रिंकमध्ये औषध टाकून अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार,पहिल्या घटनेत एका 22 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी भाजप नेत्यासह तिघांवर आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव असं आरोपी भाजप नेत्यांचे नाव असून, त्याच्याकडे वसई-विरार उपजिल्हाध्यक्ष आणि उत्तर भारतीय मोर्चाचा प्रभारीपद आहे. याप्रकरणी श्रीवास्तव याच्यासह त्याची पत्नी आणि एक सहकारी नवीन सिंग अशा तिघांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून आपल्याला बेशुद्ध केलं आणि सामूहिक अत्याचार केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसेच आपले अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत सतत अत्याचार केल्याचा आरोपासह इतर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी आचोळे पोलीस तपास करत आहे.

डेंटिस्टचा अल्पवयीन मुलीवर चार वर्ष अत्याचार

तर दुसऱ्या एका घटनेत नालासापोरा येथेच एका डेंटिस्टने अल्पवयीन मुलीच्या असाहय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर सतत चार वर्षे अत्याचार केला. योगेंद्र शुक्ला असं या डॉक्टराचं नाव असून त्याचाचा नालासोपारा पूर्वेला दातांचा दवाखाना आहे. याप्रकरणी नराधम डॉक्टर विरोधात आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई वडिल हयात नाहीत. चार वर्षापूर्वी पिडीत मुलगी डॉक्टरच्या संपर्कात आली होती. त्यावेळी त्या डॉक्टरने त्या मुलीचे आई वडिल नसल्याचं हेरून, मी तुझा सांभाळ करीन, लक्ष देईन, असं सांगून पिडीतेच्या असाहय्यतेचा फायदा घेतला आणि तिच्याशी चार वर्ष शरीरसंबध ठेवले. आपल्या असाहय्यतेचा फायदा घेऊन , डॉक्टर आपणाला फसवत असल्याच कळल्यावर त्या मुलीने आचोळे पोलीस ठाण्यात डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अत्याचार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here