टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत दाखल ;’या’ ठिकाणी करणार मुक्काम

0
2

IPL 2024 चा सीजन संपलाय. वेगवेगळ्या फ्रेंचायजीकडून खेळताना खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवलं. आता टीम इंडियाने परफॉर्म करण्याची वेळ आलीय. T20 वर्ल्ड कपचे पडघम वाजू लागले आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये येत्या 2 जूनपासून T20 वर्ल्ड कप 2024 सुरु होणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप खेळण्यासाठी अमेरिकेत दाखल झालीय. तिथे पोहोचताच, जास्त वेळ न घालवता टीम इंडियाने तयारी सुरु केलीय. न्यू यॉर्कमध्ये ग्रुप राऊंड खेळणाऱ्या टीम इंडियाने याच शहराला आपल बेस बनवलय.

रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे. टीम दोन वेगवेगळ्या बॅचमध्ये न्यू यॉर्कमध्ये पोहोचली. यात मेन स्कॉडशिवाय रिजर्व खेळाडू सुद्धा आहेत. फक्त स्टार फलंदाज विराट कोहली अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. व्हाइस कॅप्टन हार्दिक पांड्या न्यूयॉर्कमध्ये टीमला जॉइन झालाय. टीम इंडियाची जोरात तयारी सुरु आहे.

तयारीच्या दिशेने पहिलं पाऊल

टीम इंडियाने मंगळवारी 28 मे रोजी तयारीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. 2 महिन्याच व्यस्त वेळापत्रक आणि मुंबई ते न्यू यॉर्क हा मोठा प्रवास केला. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडियाने सराव सुरु केलाय. न्यू यॉर्कच्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी ट्रेनिंग सुरु केलीय.

पहिल्या दिवशी प्रॅक्टिस कशी होती?

ट्रेनर्सच्या देखरेखीखाली पहिल्या दिवशी पळण्याचा हलका सराव केला. त्यानंतर एक्सरसाइजने वॉर्म-अप केलं. त्यानंतर आपसात फुटबॉल खेळून फिटनेस तपासला. पहिल्यादिवशी टीम इंडियाने बॅटिंग, बॉलिंग किंवा फिल्डिंग प्रॅक्टिस केली नाही. प्रॅक्टिस दुसऱ्या दिवशी सुरु होण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया मुक्कामाला कुठल्या गावात?

न्यू यॉर्कच्या नासो काऊंटीमध्ये स्टेडियम बनवण्यात आलय. तिथे T20 वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. टीम इंडिया ग्रुप स्टेजमधील चारपैकी तीन सामने याच स्टेडियममध्ये खेळणार आहे. भारतीय टीम वेन्यूच्या जवळच मुक्कामाला आहे. नासो काऊंटीमधील गार्डन सिटी एक मोठ गाव आहे. टीम इंडिया तिथे उतरली आहे. हे गाव असलं तरी छोट शहरच आहे. याची लोकसंख्या 23 हजारपेक्षा जास्त आहे. स्टेडियमपासून काही किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.