बुक्कीत टेंगुळ : सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस’ विजेता ; ट्रॉफीसह रोख रक्कम व स्कुटीचा मानकरी

0
1373

Suraj Chavan Winner Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सीझन 5 च्या (Bigg Boss Marathi New Season) गुलिगत फेम ट्रॉफीवर सूरजने (Suraj Chavan) आपलं नाव कोरलं आहे. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरलं आहे.

 

सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर होती. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालंय. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली.

 

टॉप 6 स्पर्धक

निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामधून निक्की बाहेर पडल्यावर सूरजने टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं.

 

सूरज चव्हाण कोण आहे?
मूळचा बारामती तालुक्यातील असलेला सूरज हा टीकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडीलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.

 

बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता परंतु, आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here