ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

‘सुनेत्रा पवार 1 लाख मतांनी जिंकणार’, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांचा दावा

मागच्या दोन महिन्यांपासून देशभरात रंगलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल. 4 जूनला मतमोजणीचे आकडे समोर येतील. त्यावेळी कोण किती पाण्यात आहे? हे समजेल. प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्याआधी प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहे. सगळ्या महाराष्ट्राच लक्ष आहे ते बारामतीच्या लढतीकडे.

यंदा बारामती लोकसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. काका विरुद्ध पुतण्या, शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना आहे. त्यामुळे काका बाजी मारणार की, पुतण्या याकडे सगळ्यांच लक्ष आहे. बारामतीच्या निकालामुळे भविष्याबद्दलचही बरचस चित्र स्पष्ट होणार आहे. शरद पवारांकडून पक्ष आणि निवडणूक चिन्ह काढून घेतलं, त्यामुळे त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट आहे.

प्रत्यक्ष निवडणूक निकालाआधी शनिवारी एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले. त्यात बारामतीत बहुतांश एक्झिट पोल्सनी सुप्रिया सुळेंच्या बाजूने कौल दिलाय. मुलगी विरुद्ध सून या लढाईत ताईंच्या बाजूने जनमत जाताना दिसतय असं बहुतांश एक्झिट पोल्सच मत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी, सुनेत्रा पवार 1 लाख मतांनी विजयी होतील असा दावा केला आहे. किती हजारांचा लीड मिळेल?

सुनेत्रा पवार यांना बारामती तालुक्यात मोठी आघाडी मिळेल. इंदापूर, दौड, खडकवासला इथे लीड मिळेल. त्याच पद्धतीने पुरंदर, भोर विधानसभा मतदारसंघातही लीड मिळेल असा संभाजी होळकर यांना विश्वास आहे. चार तालुक्यात सुनेत्रा पवार यांना नक्कीच 100 टक्के लीड मिळेल. बारामतीमध्ये 50 हजारपेक्षा जास्त लीड मिळेल असा संभाजी होळकर यांना विश्वास आहे. अजित पवार या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत विकासाच्या मुद्यावर बोलले. त्यांनी बारामतीत आतापर्यंत जो विकास झालाय, त्या आधारावर मत मागितली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button