
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : येथील श्री. भवानी विद्यालय व आबासाहेब खेबुडकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनाचा “भवानीयन जल्लोष” हा वार्षिक स्नेह संमेलन व विविध गुणदर्शन समारंभ कार्यक्रम दिनांक २८ व २९ रोजी संपन्न होणार आहे.
मंगळवार दिनांक २८ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान पारंपारिक वेशभूषा तर ११.३० ते १२.३० दरम्यान गजीढोल, लेझीम, झांज पथकाचा कार्यक्रम असून, दुपारच्या सत्रात भवानीयन बाजार संपन्न होणार आहे.
बुधवार दिनांक २९ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळात फनीगेम्स होणार आहेत. दुपारी २.१५ ते ५.३० दरम्यान “भवानीयन जल्लोष” हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.