
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – आठवड्याच्या पहिल्याच व्यापार दिवशी शेअर बाजारात जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. सेन्सेक्सने ८१,००० चा विक्रमी टप्पा पार केला, तर निफ्टीने २४,९०० वर बंद होऊन गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. आयटी, रिअल्टी आणि धातू क्षेत्रातील समभागांनी बाजारात तेजी आणली, तर टाटा मोटर्स, नॅटको फार्मा यांसारख्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदली गेली.
दिवसअखेर बाजाराची स्थिती:
सेन्सेक्स – ६७८ अंशांची वाढ, बंद ८१,७९६ वर
निफ्टी – २२८ अंशांची वाढ, बंद २४,९४७ वर
निफ्टी बँक – ४१८ अंशांची वाढ, बंद ५५,९४५ वर
निफ्टी मिडकॅप – ५४१ अंशांची झेप, बंद ५८,७६९ वर
तेजी दाखवणारे प्रमुख शेअर्स:
एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, मॅक्स लाईफ – २-३% पर्यंत वाढ
आयजीएल (IGL) – दिल्लीच्या ईव्ही धोरणामुळे तब्बल ६% वाढ
पीआय इंडस्ट्रीज – मॉर्गन स्टॅनलीच्या पॉझिटिव्ह अहवालामुळे ४% वाढ
बीईएल (BEL) – प्रति शेअर ४०० चा टप्पा ओलांडत विक्रमी पातळी
एचबीएल इंजिनिअरिंग – ‘कवच’ प्रकल्पाची १६४ कोटींची ऑर्डर मिळाल्यामुळे ३% वाढ
बेलराईज इंडस्ट्रीज – उत्तम तिमाही निकालामुळे ४% वाढ
घसरण अनुभवलेले शेअर्स:
टाटा मोटर्स – JLR च्या कमकुवत अंदाजामुळे ४% घसरण
नॅटको फार्मा – यूएस एफडीए आक्षेपामुळे १% घसरण
बाजारातील एकूण चित्र:
आज निफ्टीमधील ५० पैकी ४६ शेअर्स, सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स आणि निफ्टी बँकेतील १२ पैकी ११ शेअर्स तेजीने बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली. विशेषतः मिडकॅप निर्देशांकात १,००० अंशांची मोठी सुधारणा पाहायला मिळाली.
चलन बाजाराची स्थिती:
रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १ पैशाने कमकुवत होऊन ८६.०७ वर बंद झाला.