
ब्रम्हानंद पडळकर : प्रसाद पिसाळ यांच्या तब्येतीची केली विचारपूस
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : पत्रकार हा लोकशाही वरचा चौथा स्तंभ आहे हा पत्रकारावर हल्ला नसून हा लोकशाही वर झालेला मोठा हल्ला आहे त्यामुळे लोकशाही आणि पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी रोज होणाऱ्या घडामोडी या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार हा फार मोठा दुवा म्हणून काम करत आहे अशा पत्रकारांच्यावर हल्ले होणे हे भूषणावह नाही, त्यामुळे आरोपीवर कडक शासन व्हावे अशी मागणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केली. विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याप्रकरणी ब्रम्हानंद पडळकर यांनी विटा येथे रुग्णालयात प्रसाद पिसाळ यांनी भेट घेवून, त्यांच्या तब्येतील चौकशी केली.
पुढे बोलताना म्हणाले, तालुक्यात आणि विटा शहरात वाढत्या गुन्हेगारीला बाळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने योग्य पावले उचलून त्यांचा बंदोबस्त करावा. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आमची नेहमीच पोलिसांना साथ राहील. यासंदर्भात योग्य उपाय योजना नाही केल्यास, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. यावेळी शंकर मोहिते, संजय विभुते, संग्राम माने, संदीप ठोंबरे उपस्थित होते.