
उत्तर प्रदेशातील शामिली येथे एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलास्वारचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हा कपड्याचा व्यापारी होता.
कारने धडक मारल्यानंतर तरुण काही अतंरावर खेचला गेला. योगेश असं तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह एका रिक्षेतून नेला. ज्यातून त्याचे पाय खाली लटकलेले दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळी कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. या घटनेनंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना सहानपूर हायवे जवळ घडली.
पहा व्हिडीओ:
उत्तर प्रदेश: शामली में संवदेना तार तार मानवता को किया शर्मशार…कार ने बाइक सवार कपड़ा व्यापारी को मारी टक्कर मौके पर हुई थीं मौत…. कार ने पीछे से टक्कर मार कर लंबी दूरी तक बाइक सवार को घसीटा था….मृतक योगेश गांव उमरपुर थाना थानाभवन कस्बा जलालाबाद में करता था कपड़े की दुकान… pic.twitter.com/LEJJW1IbGw
— निशान्त शर्मा (भारद्वाज) (@Nishantjournali) July 30, 2024