शरीर डिटॉक्स करण्याची खास टेक्निक; ५ गोष्टी करा, टॉक्सिन्स बाहेर निघतील, शरीर होईल निरोगी

0
237

शरीराला डिटॉक्स करणं खूपच गरजेचं असतं. डिटॉक्स करण्यात क्लिंजिंग, रेस्टिंग आणि नरिशिंग यांचा समावेश आहे. शरीर फक्त आतूनच नाही तर बाहेरूनही डिटॉक्स करायला हवं. डिटॉक्सचा अर्थ हा नाही की शरीराला टॉक्सिन्सपासून दूर ठेवायचं तर पोषणसुद्धा आवश्यक असते. शरीर डिटॉक्स झाल्यामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो, रक्त शुद्ध होते.

 

जर तुम्हाला खूपच थकवा येत असेल, सांध्यांमध्ये वेदना असतील, मसल्समध्ये वेदना असतील, ब्लॉटींग, गॅस किंवा इतर समस्या असतील तर शरीर डिटॉक्स करण्याची ही योग्य वेळ आहे. शरीर नैसर्गिकरित्या कसे डिटॉक्स करावे ते समजून घेऊ.

 

शरीराला पौष्टीक आहार मिळल्यानंतर आपोआप डिटॉक्स होते. यासाठी ऑर्गेनिक, नॅच्युरल पदार्थांचे सेवन करायला हवे. टॉक्सिन्सयुक्त डाएटचा समावेश आहारात करू नये. आपल्या आहारात अधिक तेल, मिरची मसाले यांचा उपयोग करू नका. काहीवेळासाठी खाण्याच्या तेलापासून ब्रेक घ्या आणि एकदम शुद्ध जेवण खा. असं भोजन केल्यानं शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होईल.

 

अधिकधिक पाणी प्या
जर तुम्ही प्राकृतिक स्वरूपात शरीरात डिटॉक्स करू इच्छित असाल तर भरपूर पाणी प्या. तुम्ही जितके पाणी प्यायल तितके टॉक्सिन्स मुत्राच्या स्वरूपातून बाहेर पडतील. याचे चांगले परीणाम दिसून येण्यासाठी ५ ते ६ लिटर पाणी प्यायला हवं. शरीरातील इम्प्यूरीटीज बाहेर निघतील. वजन कमी करण्याचा हा चांगला उपाय आहे.

 

फास्टींग ट्राय करा
रोज आपण असे काही ना काही खात असतो ज्यामुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होतात. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फास्टींग ट्राय करा. एक किंवा दोन जड मील घेण्यापेक्षा हलका फुलका आहार घ्या. फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. संपूर्ण दिवस यामुळे तुम्हाला जड वाटणार नाही. पचनक्रिया चांगली राहील.

 

हिरव्या भाज्या खा
हिरव्या भाज्या खाल्ल्यानं तुमच्या शरीराला भरपूर फायदे मिळतील. ज्यामुळे शरीर डिटॉक्स होईल. तुम्ही हिरव्या भाज्या स्मूदी, सॅलेड यांसारख्या पदार्थांमध्ये वापरू शकता. पालक, केल, लेट्यूस, काकडी यांसारख्या भाज्या तसंच गाजर, बीटसुद्धा तुम्ही आहारात घेऊ शकता. हे ड्रिंक एंटी ऑक्सिडेंट्सनी परीपूर्ण असते. ज्यामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

 

हर्बल ड्रिंक्सचे सेवन करा
हर्बल ड्रिंक्सचे सेवन केल्यानं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. तुम्ही ग्रीन टी, हर्बल टी चे सेवन करू शकता. हे ड्रिंक एंटी ऑक्सिडेंट्सनी परीपूर्ण असते. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तुम्ही चहात हर्बल ड्रिंक्सचा समावेश करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही ब्लॅक टी डिटॉक्स करण्यासाठी वापरू शकता. तुम्ही रोज या चहाचे सेवन १ वेळेस करू शकता.