नागपूरमध्ये अजित पवार गटाकडून मूक आंदोलन, कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी

0
106

नागपुरात अजित पवार गटाकडून मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मूक आंदोलन  करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक आंदोलन करणयात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून टाळ वाजवून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये धुसफूस वाढण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मूक आंदोलनाची हाक दिली आहे.”मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आणि हृदयद्रावक आहे. अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळला, ही धक्कादायक बाब आहे,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

“एक अक्षम्य चूक झाली हे नाकारता येणार नाही. या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आणि भविष्यात असे अपघात घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने गुरुवार सकाळी 11:00 ते 12:00 वाजेपर्यंत मूक आंदोलन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले होते. सरकारने चोवीस तास काम करावे आणि शिवाजी महाराजांचा सन्मान करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारावा, अशी मागणी राष्ट्रवादीने यावेळी केली. सोमवारी पुतळा कोसळल्याची घटना घडली.

त्यानंतर काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. पुतळ्याचे बांधकाम दर्जेदार नसून संरचनेत वापरलेले नट व बोल्ट गंजले होते. असा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकल्पाशी संबंधित कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here