माणदेश एक्सप्रेस न्युज:
मोमोज सध्या प्रत्येक राज्यात मिळतात. तरुणांना या स्ट्रीट फूडचं क्रेझ लागलं आहे. प्रत्येक व्यक्ती स्ट्रीट फूडमध्ये फेमस असलेले मोमोज खातात. तुम्ही देखील मोमोज खात असाल. रस्त्यावर मिळणारे हेच मोमोज खाणे तेलंगनातील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. मोमोज खाल्ल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हे मोमोज खाल्ल्याने अन्य 50 जनांची प्रकृती बिघडली. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महिलेने थोडी भूक लागल्याने हलके फुलके मोमोज खाण्यासाठी घेतले होते.
मोमोज खाऊन झाल्यावर तिला अचानक त्रास होऊ लगला. त्यानंतर ती धाडकन जमिनीवर आदळली आणि यातच तिचा मृत्यू झाला.