पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरु असताना सापडले बॉम्बसदृश्य वस्तूंचे अवशेष

0
695

माणदेश एक्सप्रेस न्युज / पिंपरी चिंचवड : शहरातील आकुर्डी प्रेम्लोक पार्क परिसरात जवळ असलेल्या एका नाल्यांमध्ये सैन्य दलात वापरण्यात येणाऱ्या बॉम्बसदृश्य काही वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. हे बॉम्ब सदृश्य अवशेष बॉम्बशोधक पथकाने ताब्यात घेतले असून याची तपासणी सुरु केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच हा सर्व प्रकार समोर आला आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे बॉम्बशोधनाशक पथक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले असून या बॉणसदृश्य सापडलेल्या वस्तूंचे तपासणी ते करत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी प्रेम्लोक पार्क परिसरात जवळ असलेल्या नाल्याच्या परिसरात असलेल्या एका पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम महापालिकेकडून केले जात आहे. हे काम सुरु केल्यानंतर खोदकाम चालू असताना या बॉम्बसदृश्य तीन वस्तू सापडल्या आहेत. पाईपलाईन दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. यानंतर महापालिकेचे पथक येथे दाखल झाले होते.