राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल नाना पेठ परिसरात गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आला. आत्तापर्यंत या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सध्या सुरू आहे. वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांच्याच दोन मुलींनी आणि दोन मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं आहे. आत्तापर्यंत 10 आरोपी निष्पन्न झाले असून चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच आत्तापर्यंत 10 आरोपी निष्पन्न झाले असून चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
‘तुला पोरं बोलवून ठोकतेच’, बहिणीने दिली होती धमकी
गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे. त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडले. त्यानंतर कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली. आंदेकर कुटुंबाच्या आशिर्वादानेच गणेश कोमकर हा गुंडगिरी करीत होता. गणेश कोमकर याने स्वत:ची गँग तयार केली होती. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना ‘तुला पोरं बोलवून ठोकतेच’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आंदेकर याच्यावर एका पाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या
गणेश कोमकर याने या अगोदर शिवसेना शहर प्रमुच रामभाऊ पारेख यांच्यावर अॅवसिड हल्ला केला होता. वनराज आंदेकर याला आपल्यावर हल्ला होऊ शकतो, याची जाणीव होती. त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यात वावरत असे. रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्याच्याबरोबर मुले नव्हती. घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. त्याच्याबरोबर एक नातेवाईकही होता. त्याचवेळी 5 ते 6 दुचाकीवरुन 10 ते 12 हल्लेखोर आले. त्यांच्यापैकी एकाने आंदेकर याच्यावर एका पाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर काही जणांनी कोयत्याने सपासप वार केले. त्यात आंदेकर जागेवरच कोसळला. एका मिनिटात झालेल्या या घटनेनंतर दुचाकीवरुन आलेले सर्व हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर लोकांनी वनराज आंदेकर याला जखमी अवस्थेत के ई एम रुग्णालयात नेले. तेथे त्याचा तपासणीपूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.