धक्कादायक! काकाने केली चार वर्षाच्या भाचीची निर्घृण हत्या, ‘हे’ आहे कारण

0
297

घरगुती वादातून एका नातेवाईकाने चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. या घटनेनं संपुर्ण शहर हादरले आहे. ही घटना दिल्लीतील नरेला भागात घडली आहे. मुलीचा मृतदेह (Deathbody) एका जंगलात आढळून आला. आरोपीला पोलिसांनी अटक (Arrest) केले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नरेला भागातील एका चार वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मुलीची हत्या तिच्या काकानी केल्याचे समोर आले आहे. रविवार पासून मुलगी घरातून बेपत्ता होता. त्यामुळे वडिलांनी तिचा शोध सुरु केला. आसपासच्या परिसरात मुलीचा शोध घेतला. घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सोमवारी घराजवळील जंगल परिसरात मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर घटनेला तात्काळ प्रतिसाद देत पोलिसांनी आरोपीला देखील ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासातून असे समोर आले की, घरगुती भांडणातून मुलीची हत्या करण्यात आली. त्याच परिसरात राहणाऱ्या काकाचे आणि मृत मुलीच्या आईचे भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे तपासातून दिसत आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले. आरोपीला सीतापूर येथून अटक केले. आरोपीवर पोलिसांनी १०३, २३८ कलम अतंर्गत गुन्हा दाखल केला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here