धक्कादायक! शेतात काम करताना विजेच्या तारांचा धक्का लागून तिघांचा मृत्यू

0
370

विजेचा झटका लागताच एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. शेतात कामाला गेलेल्या दोन भावांच्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. मुलांचा शोध घेण्यासाठी आलेल्या वडिलांचाही तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचे गावांकऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावात ही घटना घडली. मृतांमध्ये शेतकरी अशोक पवार, त्यांचा मुलगा मारोती पवार आणि भावाचा मुलगा दत्ता पवार यांचा समावेश आहे. राज्यात सगळीकडे पावसाची बॅटींग सुरु आहे. त्यामुळे गावात पेरणींसह शेतात कामे सुरु आहे. शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन भावांना विजेचा धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी सांगितले की, विजेत्या तारा खाली पडलेल्या होता आणि त्यांचा शॉर्क लागला. बराच वेळ मुले घरी परतली नाही त्यामुळे वडिल त्यांना शोधण्यासाठी निघाले. शेतात शोधता शोधता ते देखील विजेच्या तारांच्या संपर्कात आले आणि त्यांचा मृत्यू झाला. तिघांच्या मृत्यू माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी वीजवितरण विभागाला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी देखील या घटनेची नोंद घेतली आहे. महाविरतणाच्या निष्काळजीपणामुळे हा घात झाला अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here