पीडीत मुलीच्या 2 सप्टेंबरला पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शेखने तिला नालासोपारामध्ये भेटायला बोलावले होते. ट्युशनच्या निमित्ताने तिला बोलावले होते. मात्र जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी संधी साधत मुलीवर बलात्कार केला.
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून महिला, मुलींच्या मनात पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सध्या त्याच्या विरूद्ध कडक कायदे करण्याची मागणी होत असताना पालघर मधून अजून एक घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. तर अन्य फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या दोघांकडून अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या मुलीला घडल्या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. ही बाब बाहेर उघड झाल्यास व्हिडिओ रीलीज करण्याचीही धमकी देण्यात आली होती.
पालघर मध्ये नालासोपारात हा प्रकार घडला आहे. अचोले पोलिस स्टेशन कडून ही माहिती देण्यात आली आहे. सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात BNS च्या कलमांचा भंग केल्याचा आणि पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणामध्ये Jian चा शोध सुरू आहे तर 23 वर्षीय Anees Shaikh ला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी मालाड येथील रहिवासी आहे. शेख सोबत तिची सोशल मीडीयामध्ये ओळख झाली होती. ऑगस्ट महिन्यात त्यांच्यात मैत्री झाली. दरम्यान पीडीत मुलीच्या 2 सप्टेंबरला पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शेखने तिला नालासोपारामध्ये भेटायला बोलावले होते. ट्युशनच्या निमित्ताने तिला बोलावले होते. मात्र जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी संधी साधत मुलीवर बलात्कार केला.
5 सप्टेंबरला Anees ने पुन्हा बोलावले. अर्नाळा ते एका लॉजवर गेले. तेथे पुन्हा तिच्यावर बलात्कार झाला. Jian ने या प्रकाराचा व्हिडिओ देखील शूट केला. आरोपींनी मुलीला सातत्याने धमकावत तोंड न उघडण्याची धमकी दिली होती. जर तोंड उघडलं तर त्याचे परिणाम वाईट होतील असं तो म्हणत राहिला.
अल्पवयीन मुलीने धीर गोळा करत अर्नाळा सागर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली. पहिला बलात्कार अचोळे मध्ये झाल्याने तेथे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत नंतर ट्रांसफर केली. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.