अलीकडे ह्रदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसतेय. पूर्वी वृध्द व्यक्तीनां हा आजार होत होता परंतु आता महिलांसह तरुणांना आणि अल्पवयीन मुलांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. गुजरात येथीस वलसाड जिल्ह्यात बर्थडे पार्टी साजरा करत असताना एका महिलेचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना हॉलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वलसाड जिल्ह्यात मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने आईचा मृत्यू झाला. वाढदिवसाच्या पार्टीत मुलाची आई पाहुण्या मंडळींची व्यवस्था करत होती. मुलाचे वडिल आणि आई दोघेही घेऊन उभी होती. आईने मुलाला अंगावर उचलून घेतले होते. अचानक थोड्या वेळाने तिला छातीत दुखू लागलं म्हणून मुलाला तिनं वडिलांकडे सोपवलं. तेवढ्यात महिला अचानक स्टेजवरून खाली कोसळली. तिला उचलण्यासाठी पाहण्यामंडळींनी मदत केली. तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
यामिनी असं मृत महिलेचे नाव आहे. ही घटना हॉलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पार्टीत सर्व जण एन्जॉय करताना दिसत आहे. मुलाचे आई आणि वडिल दोघेही त्याला स्टेजवर घेऊन उभे आहेत. यामिनी अचानक स्टेजवरून खाली कोसळले तेव्हा हॉलमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेनंतर यामिनी यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पहा व्हिडीओ:
महिला को पार्टी में आया अचानक से हार्ट अटैक, हुई मौत…#heartattack #CCTV #Valsad #Vapi #viralvideo #tranding #LatestUpdates #MahanagarTimes pic.twitter.com/tno8inMtx1
— Mahanagar Times (@MahanagarTimes_) September 16, 2024