धक्कादायक! शाळेत घुसून मुख्याध्यापकावर गोळी झाडली, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

0
8

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील तेल्हारा हायस्कूलमध्ये बुधवारी सकाळी एका व्यक्तीने मुख्याध्यापक संतोष कुमार यांच्यावर स्टाफ रूममध्ये गोळ्या झाडल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक हल्लेखोर भगव्या रंगाचा रुमाल खांद्यावर घेऊन शाळेत घुसल्याचे दिसत आहे.

फोनवर बोलत असलेल्या संतोष कुमारपर्यंत तो पोहोचतो आणि काहीही न बोलता त्याच्या डाव्या पायात गोळी झाडतो. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9.25 च्या सुमारास हा हल्ला झाला. यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने एकंगरसराय प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोराने शाळेत प्रवेश करून गोळीबार करण्यापूर्वी बाहेरून कुमारला हाक मारली होती. याच व्यक्तीने यापूर्वीही एका विद्यार्थ्यावर हल्ला केला होता, मात्र तक्रार नसल्याने सोडून देण्यात आले होते. या घटनेत सहभागी असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागे भीती पसरवण्याचा उद्देश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here