धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या मुलीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

0
152

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे खासगी प्री-विद्यापीठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीने सोमवारी शाळेच्या आवारातच एका मुलाला जन्म दिला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इयत्ता 11वीत शिकणाऱ्या मुलीने महिलांच्या शौचालयात मुलाला जन्म दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर मुलीच्या पालकांनी कोलार महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी आणि मुलगा गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मुलगी गरोदर होती, पण कुटुंबाला गर्भधारणेची माहिती कशी मिळाली नाही आणि त्यांनी ही माहिती का लपवली हे अद्यापही गूढच आहे. या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा पोस्ट-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here