धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून मुलीच्या मानेवर कात्रीने  6 वार, वर्धा जिल्ह्यातील घटना

0
76

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये 24 वर्षीय तरुण प्रेमात इतका क्रूर झाला की, त्याने मुलीच्या मानेवर कात्रीने 6 वार केले. संदीप मसराम असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात कोणीही नव्हते आणि आरोपी पीडितेच्या घरातील बाथरूममध्ये बसला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात कोणी नसताना आरोपी मुलीच्या बाथरूममध्ये लपून बसला होता. मात्र कुत्रा भुंकल्याने आरोपीने मुलीच्या मानेवर कात्रीने सहा वार केले. या हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

हल्ल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र गावातील लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर वर्धा जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here