धक्कादायक! बांग्लादेशात अवामी लीगच्या 20 नेत्यांची हत्या, 27 जिल्ह्यात हिंदुंवर हल्ले

0
542

बांग्लादेशमध्ये अजूनही हिंसाचार सुरु आहे. तिथून चिंता वाढवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. विद्यार्थ्यांच्या विरोधातून उभ्या राहिलेल्या आंदोलनामध्ये आज देश जळत आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही हिंसाचार सुरु आहे. एक धक्कादायक घटना घडली आहे. शेख हसीन यांच्या अवामी लीग पार्टीच्या 20 नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या अवामी लीगच्या नेत्यांना आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. अवामी लीगच्या 20 नेत्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरात आणि दुकानांमध्ये तोडफोड, जाळपोळ सुरु आहे.

बांग्लादेशच्या सतखिरा येथे झालेल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाला. कुमिलामध्ये 11 लोकांना ठार मारण्यात आलं. बांग्लादेशचे माजी काउन्सिलर मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला दंगलखोरांनी आग लावली. यात सहाजणांचा मृत्यू झाला. बांग्लादेशातील प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचं ढाका धानमंडी येथील 140 वर्ष जुन घरं समाजकंटकांनी जाळलं. आनंदच हे घर जिवंत सांस्कृतिक केंद्र होतं. दंगलखोरांनी हे घर जाळण्याआधी तिथे लुटमार केली.

भारतात येण्यासाठी निघालेल्या मंत्र्याला विमानतळावरच अटक

शेख हसीना देश सोडून पळाल्या आता त्यांच्या पक्षाचे नेते, मंत्री यांना लक्ष्य करण्यात येतय. बांग्लादेशचे माजी परराष्ट्र मंत्री हसन महमूद यांना ढाका एयरपोर्टवरुन ताब्यात घेण्यात आलं. ते भारतात येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी अटक झाली. बांग्लादेशात सत्तापालट होण्याआधी शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री देशाबाहेर पळाले होते. अवामी लीगचे सरचिटणीस आणि रस्ते परिवहन मंत्री अब्दुल क्वादर रविवारी रात्रीच देशाबाहेर निघून गेले. हसीना सरकारमध्ये मंत्री राहिलेले अनिसुल हक देशसोडून अज्ज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.

पोलिसांचा संप

सत्तापालटानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. देशाच्या 27 जिल्ह्यात हिंदुंवर हल्ले झाले आहेत. उपद्रवी मंदिरांना सुद्धा लक्ष्य करत आहेत. बांग्लादेश पोलिस सर्विस असोसिएशनने (BPSA) मंगळवारी संपाची घोषणा केली. जो पर्यंत पोलिसांची सुरक्षा निश्चित होत नाही, तो पर्यंत आम्ही संपावर आहोत. सोमवारी बांग्लादेशात 400 पेक्षा अधिक पोलीस स्टेशन्सवर हल्ला झाला. यावेळी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here