ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडिलांना सरप्राईज देण्यासाठी गावी निघाली पण वाटेतच झाला अपघात

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पोर्शे कारने (Porsche Car) दोघांना चिरडरलं. त्यात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अचानक दोघांचा मृत्यू झाल्याने दोघांच्याही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यात अश्विनी कोस्टा हिच्या आईने लेकीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आक्रोश केला. अश्विनी तिच्या वडिलांना सरप्राईज देण्यासाठी गावी जबलपूरला जाणार होती. मात्र त्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अश्विनी कोस्टाच्या आईने ससून रुग्णालयात येऊन लेकीचा मृतदेह पाहताच टाहो फोडला. त्यानंतर त्या म्हणाल्या की, अश्विनी आणि माझं शनिवारी रात्री बोलणं झालं होतं. ती 18 जूनला जबलपूरच्या येणार होती. तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने सरप्राईज प्लॅन केला होता. मात्र दुर्देवाने देवाने तिला आम्चायपासून कायमचं हिरावून घेतलं. एका श्रीमंत बापाच्या मुलाच्या चुकीने आम्ही आमची लेक गमावली. एखाद्याच्या मुलाच्या हुल्लडबाजीची शिक्षा आमच्या मुलीला झाल्याचंदेखील तिची आई म्हणाली.

अश्विनी ही मुळची जबलपूरची आहे. ती इंजिनिअर होती. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतलं आहे. अश्विनी आणि अनिश दोघेही जॉन्सन कंट्रोल कंपनीत काम करत होते. या कंपनीच त्यांनी मैत्री झाली आणि त्यानंतर दोघे पार्टीला वगरे जात असत. मात्र ही पार्टी दोघांचीही शेवटची पार्टी ठरली.

गाडीची नोंदणींच नाही!
ज्या पोर्शे कारने दोघांचा जीव घेतला त्या कारसंदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेदांतने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती अजूनपर्यंत पूर्ण झाली होती. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. इतरवेळी हेल्मेट घातलं नसताना कारवाईचा दंड ठोठवणारे पोलीस मार्चपासून ही कार विनाक्रमांक धावतेय, हे का बघू शकले नाही?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button