राज्य सरकार आणि गृहखात्याने संवेदनशील व्हावं.., शरद पवार यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला

0
135

 

जे बदलापूरला घडलं. ते अत्यंत निषेधार्ह आहे. दुसरीकडे चिंताजनक आहे. दोन लहान मुलींवर अत्याचार झालं आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात होतो हे धक्कादायक आहे. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया बदलापूरच नाही तर अनेक ठिकाणी उमटत आहे. बदलापूरला जो प्रकार झाला त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सर्वांनी मागणी केली आहे. सरकारने अशा प्रसंगाना आवर घालण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. गृहखात्याच्या यंत्रणेने सतर्क राहिलं पाहिजे. जिथे गरज आहे तिथे कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे काल काही बोलण्यात आलं ते बदलापूरपुरतं समिती नव्हतं. त्यानंतर तीनचार दिवसापूर्वी कुठे ना कुठे काही ना काही गोष्टी अन्य ठिकाणी होत असल्याचं दिसत असेल, असे ते म्हणाले.

कुठे बालिकांवर तर काही ठिकाणी मुलींवर होत होतं. हे चित्र राज्यात दुर्देवाने वाढत आहे. त्याबाबतचा उद्वेग आणि राग लोकांमध्ये आहे. त्यामुळे उद्या एक दिवसाचा बंद करण्यात येणार आहे. तो बंद शांततेत पार पाडू. यातून जनभावना समजून घेण्याची काळजी घ्यावी यासाठी हा बंद आहे. आमच्या पक्षातील सर्व सहकारी सहभागी होतील. राज्यातील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे. बंद शांततेत व्हावा, असे आवाहन पण त्यांनी केले.

गृहखात्यानं संवेदनशील व्हावं

एका वृत्तपत्राने अत्याचाराची आकडेवारी जाहीर केली आहे. हे थांबत नाही, वाढत आहे. त्यामुळे समाजाला, कायद्याची यंत्रणा आणि सरकारला जागृत करावं लागेल. मी कुणाला दोष देत नाही. पण शांततेच्या चौकटीत राहून ही काळजी घेता येईल. लोकांनी आपली रिॲक्शन व्यक्त केली. भावना व्यक्त केल्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं योग्य नाही. राज्य सरकार आणि गृहखात्याने त्याबाबत संवेदनशील व्हावं राज्य सरकार आणि गृहखात्याने त्याबाबत संवेदनशील व्हावं, असा चिमटा काढत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.