पहा नियमित अनवाणी चालण्याने आपल्या शरिराला होणारे अनेक फायदे

0
2

आपले शरिर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी अनेक उपाय आपण करत असतो. त्यापैकी एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे अनवाणी चालणे. नियमित अनवाणी चालण्याने आपल्या शरिराला अनेक फायदे होता. पूर्वी काळात बहुताश: लोक पायाचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी अनावणी पायाने चालायचे. या मॉर्डन जगात आता कुणीच अनावणी चालताना दिसत नाही, मात्र हे शरिराला अनेक फायदे करून देणारे आहे. आपल्या दैनंदिन जीवनात काही वेळ अनवाणी चालण्यासाठी खर्च करा. चला तर मग अनवाणी चालण्याचे काही प्रमुख फायदे जाणून घेऊया.

१. नैसर्गिक ऊर्जा- अनवाणी पायाने चालल्यामुळे आपल्या पायांना थेट जमिनींचा स्पर्श होतो. त्यामुळे आपल्या शरिराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि शरिरातील इलेक्ट्रॉन्सचे संतुलन राखले जाते. शक्य झाल्यास सकाळी अनावाणी पायाने चाला.

२. रक्ताभिसरण सुधारते: अनवाणी पायने चालल्याने शरिरातील रक्ताभिसरण सुधारते. पायांतील शिरांंमध्ये रक्ताचा प्रवाह वाढतो. अनवाणी पायाने चालल्याने पायांच्या स्नायूंना अधिक काम करावे लागलात. गवतात किंवा मातीत चालल्याने शांत झोप लागते.

३. स्नायूंचा विकास: डॉक्टर आपल्याला नेहमी चालण्याचा सल्ला देतात. दिवसांतून ३० ते ४५ मिनिटे चालले पाहिजे. त्यापैकी २० मिनिट नेहमी अनावणी पायाने चालल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात आणि पायांची मजबूती वाढते.

४. तणावमुक्ती: धावपळीच्या जीवनात तणाव वाढल्याने शरिर आणि मन कमजोर होतो. त्यामुळे जास्त काही न करता गवतात अनवाणी पायाने चाला यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. अनावाणी पायाने चालल्याने मन: शांती मिळते आणि तणाव दूर होईल.

५. दृष्टी सुधारणा: अनवाणी चालल्याने आपल्या पायांच्या तळाशी असलेल्या संवेदी तंत्रिका उत्तेजित होतात. यामुळे आपल्या शरीरातील विविध अवयवांशी संबंधित नसांवर सकारात्मक परिणाम होतो, ज्यामध्ये डोळ्यांची दृष्टी सुधारणे हेदेखील समाविष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here