पहा बदामाचे दूध पिल्याने होणारे फायदे ;सकाळी की रात्री कधी पिणे अधिक फायदेशीर?

0
3

दुधाचे अनेक फायदे अनेकांना माहित आहेत. तर बदाम खाण्याचा सल्ला देखील डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहित आहे की जर तुम्ही दुधात बदाम टाकून पित असाल तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकता. काय आहेत त्याचे फायदे जाणून घेऊयात.
दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पण तुम्हाला माहित आहे का की दुधात जर तुम्ही बदाम मिसळून प्यायले तर तुमच्या आरोग्याला दुहेरी फायदे होते. बदाम आणि दूध दोन्हीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. डॉक्टर बदाम खाण्याचा नेहमीच सल्ला देतात. बदाम आणि दूध प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते, त्यामुळे कमकुवत हाडे मजबूत होतात. एवढेच नाही तर या दोघांचे एकत्र सेवन केल्याने अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.

बदाम आणि दुधात भरपूर पोषक घटक असतात.दुधात कॅल्शियम, प्रथिने आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याच बरोबर बदामामध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात.

बदाम दूध पिण्याचे फायदे

बदाम आणि दूध एकत्र सेवन करणे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई तुमच्या निस्तेज त्वचेला आणि निर्जीव केसांना जीवदान देते.

बदामाच्या दुधात भरपूर कॅल्शियम असते, जे कमकुवत हाडे मजबूत करण्यास मदत करते. बदामाच्या दुधाचे सेवन हाडांच्या रुग्णांसाठी अमृतापेक्षा कमी नाही. बहुतांश महिलांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. अशा स्थितीत त्यांनी बदाम आणि दूध अवश्य सेवन करावे.

तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तुम्ही खोकला, सर्दी आणि फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांना लवकर बळी पडता. अशा स्थितीत तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त बदामाच्या दुधाचे सेवन करा.

तुमचे शरीर नेहमी थकलेले आणि सुस्त असेल तर बदामाच्या दुधाचे सेवन सुरू करा. बदाम मिसळून दूध प्यायल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. यामुळे तुम्हाला बळही मिळेल.

केव्हा आणि कसे सेवन करावे?
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर कधीही बदामाचे दूध घेऊ शकता. एका ग्लास गरम दुधात ३-४ बदाम मॅश करुन टाका. रात्री झोपण्यापूर्वी ते पिऊन घ्या. बदाम रात्रभर भिजत ठेवा. त्याची साल काढून दुधात बारीक करून नाश्तानंतर पिऊन घ्या.