मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी (Colleges, Schools Close) जाहीर केली आहे. राज्यातील पर्जन्यमानाची सध्यास्थिती पाहता भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert) जारी केला आहे. जो तीव्र पावसाची शक्यता दर्शवितो. मुंबईत आधीच पावसाची संततधार सुरू असून, येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट (Yellow Alert for Mumbai) जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि वेगळ्या भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे. याशिवाय पुणे, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
IMD ने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अपेक्षीत मुसळधार पावसामुळे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हे, मावळ, मुळशी आणि खडकवासला यासह लगतच्या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यासाठी आयएमडीच्या ऑरेंज अलर्टनंतर पालघरनेही सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत.
रायगड, पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी
हवामान अंदाज आणि मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. असाच आदेश पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड तालुक्यांसाठीही जारी करण्यात आला आहे. दोन्ही जिल्हे महाराष्ट्राच्या किनारी भागात आहेत. ठाणे जिल्ह्यातही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
एक्स पोस्ट:
Maharashtra | All schools and colleges in Palghar district closed after IMD issued an orange alert for today: Palghar Collector's Office
— ANI (@ANI) July 25, 2024
रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट
IMD ने बुधवारसाठी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता, जो गुरुवारीही सुरू होता, मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज होता. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, प्रशिक्षण संस्था, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे कुंडलिका, अंबा आणि सावित्रीसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत, ज्यामुळे दळणवळण नेटवर्क विस्कळीत झाले आहे.
पालघरमध्ये अतिवृष्टी
पालघरमध्ये अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली. हवामान खात्याने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वाडा आणि विक्रमगड तालुक्यांच्या तहसीलदारांनी दिलेल्या ग्राउंड रिपोर्टच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
एक्स पोस्ट
Maharashtra | All schools and colleges in Palghar district closed after IMD issued an orange alert for today: Palghar Collector's Office
— ANI (@ANI) July 25, 2024
कोकण गोवा महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता
IMD च्या हवामान बुलेटिनमध्ये कोकण, गोवा (जुलै 25-27) आणि मध्य महाराष्ट्रात (26-27 जुलै) अतिवृष्टी अपेक्षित आहे. सध्या सुरू असलेल्या पावसादरम्यान, मुंबईत आधीच वार्षिक सरासरीच्या जवळपास 80 टक्के पाऊस झाला आहे. मंगळवार ते बुधवारी सकाळ दरम्यान, IMD च्या सांताक्रूझ स्टेशनवर 46 मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा वेधशाळेत 38 मिमी पावसाची नोंद झाली.