Sangli: मगरीच्या हल्ल्यात युवक ठार

0
260

माणदेश एक्सप्रेस/अंकलखोप : मगरीच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी अंकलखोप (ता. पलूस) येथे घडली आहे. भिलवडी पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात बोटीतून शोध घेत असताना बुधवारी ( दि. २) भिलवडी येथील हाळभाग येथे युवकाचा मृतदेह आढळून आला. अजित अनिल गायकवाड (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

 

अजित गायकवाड हा मंगळवारी (दि.१) रोजी कृष्णा नदीवर दुपारी १ वाजता पोहण्यासाठी गेला होता. दुपारी घरी न आल्यामुळे घरातील लोकांनी गावात त्याचा शोधा घेतला. बुधवारी सकाळी गावातील लोक नदीवर पोहण्यासाठी गेले असता त्यांना नदी काठावर अजितचे कपडे व चप्पल आढळून आली. नागरिकांनी अजितच्या घरच्यांना माहिती दिली व त्यानंतर संबंधित कपडे व चप्पल अजितचे असल्याचे घरच्यांनी ओळखले.

 

 

 

अजितचा चुलत भाऊ अविनाश बाळासो गायकवाड यांनी अजित हरविला असल्याची तक्रार बुधवारी सकाळी भिलवडी पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर भिलवडी पोलिस व वनविभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ यांनी नितीन गुरव यांच्या मदतीने नदी पात्रात बोटीतून शोधा शोध सुरू केली. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास भिलवडी येथील हाळभाग येथे अजितचा मृतदेह झुडपात तरंगताना आढळला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here