
Video: भारतीय कसोटी संघाचा नवा उपकर्णधार ऋषभ पंत सध्या इंग्लंडमध्ये आहे. कसोटी क्रिकेट असो वा टी२० क्रिकेट असो… पंत हा कायम उत्तुंग फटकेबाजीसाठी ओळखला जातो. भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. २० जूनपासून भारत विरूद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर आधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. याच दरम्यान, पंतने आपल्या सरावाच्या सत्रात सणसणीत षटकार मारून लॉर्ड्सच्या स्टेडियमचे छत फोडले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना लीड्समध्ये खेळला जाईल. त्याआधी टीम इंडिया लॉर्ड्सवर सराव करताना दिसली, इथे ११ जूनपासून वर्ल्ड कप फायनल सुरू होणार आहे. लॉर्ड्सवर सुरू असलेल्या टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान ऋषभ पंतने नेट्समध्ये वॉशिंग्टन सुंदरविरुद्ध एक दमदार षटकार मारला. त्या फटक्यानंतर चेंडूत थेट लॉर्ड्सच्या छतावर पडला. चेंडू ज्या ठिकाणी पडला, त्या ठिकाणी छताला खड्डा पडला.
Rishabh Pant's destructive batting has arrived in the UK 💥 pic.twitter.com/AERl4DrXcv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 9, 2025