15 मिनिटात बॅरिकेटिंग काढा, अन्यथा सागर बंगल्यापर्यंत फेकतो ; मनोज जरांगे आक्रमक ; वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे समन्वयक आमनसामने

0
365

माणदेश एक्सप्रेस न्युज : जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवलीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी वडीगोद्रीत अडवले आहे. बॅरिकेटिंग करत रस्ता पोलिसांनी बंद केला. त्यामुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले. वडीगोद्रीत रात्री ओबीसी आरक्षणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले.

 

मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून रात्री घोषणाबाजी करण्यात आली. अंतरवलीकजे येणाऱ्या आंदोलकांना अडवल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. 15 मिनिटात बॅरिकेटिंग काढा अन्यथा सागर बंगल्यापर्यंत फेकतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. रात्री मनोज जरांगेंनी मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांना फोन केला. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग हटविण्यात आले आहे.

 

तर मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मागील पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. आजचा बंद शांततेत पार पडेल असं आश्वासन जरांगे समर्थकांनी दिलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बीड शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.