मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन एकाची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

0
182

 

मुंबई पोलिसांनी सदर घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, गुरुवारी रात्री 1 वाजताच्या आसपास वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने उडी मारली असून घटनास्थळी मदतीसाठी पोलिसांनी तात्काळ यावे, अशी माहिती आम्हाला मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सी लिंकवरील पोल क्रमांक 83 आणि 84 जवळ पोहचले.

सदर ठिकाणी पोहोचल्यावर एका व्यक्तीने तेथे कार (एमएच 43 बीएक्स 7670) उभी करून कारमधून खाली उतरून सी लिंकवरून समुद्रात उडी मारल्याची माहिती मिळाली. वरळी पोलिसांनी तात्काळ वरळी आणि वांद्रे अग्निशमन दलाला पाचारण केले, त्यांनी बॅटरीच्या सहाय्याने समुद्रात सदर व्यक्तीचा शोध घेतला, मात्र रात्रीचा अंधार आणि समुद्रातील उंच लाटांमुळे त्याचा शोध लागला नाही.

सकाळी साडेसात वाजता वरळी पोलीस ठाण्याला दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उडी मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी तो नायर रुग्णालयात पाठवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव अल्ताफ मोहम्मद हुसेन असून तो मुंबईतील गोवंडी येथे आपल्या नातेवाईकांसोबत राहत होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृताच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे, मात्र आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here