आटपाडीच्या “माणगंगा” साखर कारखान्याबाबत आम. गोपीचंद पडळकर “चाबूक मोर्चात” काय म्हणाले….

0
47
आमदार गोपीचंद पडळकर

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या वतीने काल दिनांक २५ रोजी विविध मागण्यासाठी भव्य “चाबूक मोर्चा” काढण्यात आला. यावेळी मोर्चाला संबोधित करताना व जिल्हा बँकेच्या भ्रष्ट कारभार कसा असतो याचे उदाहरण सांगताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख केला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा या मागणीसाठी येत्या 25 जूनला जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा काढत, बँकेतील घोटाळे बहादरांचा मोरक्या जयंत पाटील हे असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला.

यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी माणगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत म्हणाले, सदरचा साखर कारखाना हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात होता. तो कोणताही करार न करता चोराच्या ताब्यात चालवायला दिला, हे जिल्ह्यातील सर्वांना माहिती आहे. याच कारखान्यासाठी देवस्थानची जमीन जिल्हा बँकेला तारण देण्यात आली. तारण देण्यात आलेल्या जमिनीचा दर गुंठ्याला तीन लाख रुपये असताना तो चाळीस लाख रुपये वाढवून दाखविण्यात आला. तसेच कुठलाही करार नसताना उसतोड मजुरासाठी १३ कोटीचे कर्ज देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील झालेले राजकारण सर्व जिल्ह्याला माहित आहे. ऐनवेळी सत्ताधारी असलेल्या माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख व जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी त्यांचे गटाचे सर्वच अर्ज माघारी घेतल्याने कारखाना बिनविरोध निवडणूक होत, कारखान्याची सत्ता जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या ताब्यात गेली होती. निवडणुकीनंतर त्यांनी सदरचा कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना यामध्ये म्हणावे तसे यश आले नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here