
नवी दिल्ली : IDBI बँकेने आजपासून म्हणजेच 8 मे 2025 पासून 676 Junior Assistant Manager (JAM) पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. याआधी बँकेने संपूर्ण देशभरात JAM Grade ‘O’ पदांसाठी ही भरती जाहीर केली होती. इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
IDBI JAM भरती 2025: (Last Date of Application)
IDBI बँकेने 8 मे 2025 पासून Junior Assistant Manager JAM Grade ‘O’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे जाहिरात क्र. 03/2025-26 अंतर्गत 676 जागा भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या पदांसाठी निवड प्रक्रिया
ऑनलाइन टेस्ट (OT),
कागदपत्र पडताळणी (DV),
वैयक्तिक मुलाखत (PI) आणि
पूर्व भरती वैद्यकीय चाचणी (PRMT) वर आधारित असेल.
लेखी परीक्षा 8 जून 2025 रोजी देशभरात होणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना Class A city मध्ये CTC रु. 6.14 लाख ते 6.50 लाख दरम्यान पगार मिळेल.
ऑनलाईन चाचणीचे स्वरूप:
IDBI बँक भरती 2025 महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्जाची सुरुवात – 8 मे 2025
अर्जाची अंतिम तारीख- 20 मे 2025
लेखी परीक्षा- 8 जून 2025
रिक्त जागांचा तपशील:
Junior Assistant Manager (JAM): 676 पदे
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील स्नातक पदवी आवश्यक (General/EWS/OBC – 60%, SC/ST/PwBD – 55%)
फक्त डिप्लोमा पूर्ण केलेले उमेदवार पात्र ठरणार नाहीत.
कंप्युटर साक्षरता आवश्यक
वय मर्यादा:
किमान वय: 20 वर्षे
कमाल वय: 25 वर्षे
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.idbibank.in
मुख्यपृष्ठावरील “IDBI Bank Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा
आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करा
संबंधित कागदपत्रे अपलोड करा
अर्जाची प्रिंटआउट प्रत भविष्यासाठी जतन करा