
पुणेरी पाट्या हा वर्षानुवर्षे चर्चेत राहिलेला विषय आहे. पुणेकरांच्या या पुणेरी पाट्या जितक्या वाचायला मजेशीर असतात तितक्याच त्या खोचकपणे चांगला संदेश देऊन जातात. पुणेकरांची शान असलेली ही पाटी अनेकदा लोकांचा अपमान करते; पण नियम म्हणजे नियम आणि याचे पालन केलेच पाहिजे, असा धडा शिकवून जाते.पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. मात्र ही पुणेरी पाटी डोंबिवलीत एका घराबाहेर लावल्यानं तिची जरा जास्तच चर्चा आहे. पुणेरी शैलीतली पाटीचा फोटो सध्या व्हायरल होत असून पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.
पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात, अशीच एक पाटी डोंबिवलीत एका घराबाहेर लावली होती. या पाटीवर गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना असा टोमणा दिला आहे की वाचून तुम्हीही म्हणाल पुणेकरांचा तर नादच नाही.. ही पाटी वाचून कोणी चूकूनही गेटसमोर पार्किंग करायची हिम्मत नाही करणार.
आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर थेट गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना चांगलाच टोला दिलाय. पाटीवर लिहलंय की, “मी गाढव आहे, म्हणूनच मी गेटसमोर गाडी लावणार.” आता हे वाचून कुणी चुकूनही गेटसमोर गाडी पार्क करणार नाही. गाडी नो पार्किंगमध्ये लागली, की ती ‘टो’ होण्याची भीती असतेच. पण आपल्याकडे अनेकजण या भीतीच्या पलिकडे गेले आहेत. वारंवार सांगूनही बेशिस्तपणे गाड्या पार्क करण्याचे प्रताप आपल्या आजूबाजूला होताना सहज दिसतील. त्यासाठी फार शोधाशोध करण्याची गरज नाही. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना आवरण्यासाठी काहीतरी करायला तर हवं! फक्त गाडी ‘टो’ करुन, दंडांच्या पावत्या फाडून बेशिस्त पार्किग करणारे ताळावर येण्याची शक्यता कधीचीच संपुष्टात आली आहे. अशावेळी काहीतरी नवं करण्याची गरज आहे. हेच या पुणेरी लोकांनी केलं.