अभिमानास्पद! आटपाडीच्या पठ्याने इतिहास रचला, भारताला गोळाफेकमध्ये पदक मिळवून दिलं

0
419

 

सचिन खिल्लारे हा ४० वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते.

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये मराठमोळ्या सचिन खिल्लारे याने इतिहास रचला आहे. सचिनने पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. हे आजचे (४ सप्टेंबर) पहिले पदक आहे.

या रौप्य पदकासह सचिन खिल्लारे हा ४० वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते.

सचिन सर्जेराव खिलारी हा सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा आहे. तो ९ वर्षांचा असताना सायकवरून पडला, यात त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. यानंतर गँगरीनमुळे त्याच्या डाव्या हाताच्या हालचालींवर मर्यादा आली.

दरम्यान, सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या २१ झाली आहे. सचिनने १६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here