
प्रथमेश परबने गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘होय महाराजा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता होती. अशातच आता या हटक्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. ‘होय महाराजा’च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळत आहे. कॉमेडी कथानक असलेल्या या चित्रपटात रमेशची लव्हस्टोरी सर्वाधिक चर्चेची असेल. चित्रपटात नेमकी कशी कॉमेडी खुलते हे ट्रेलर पाहिल्यावर कळेल. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रथमेश परबसह, अंकिता लांडे, अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, समीर चौघुले, वैभव मांगले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर चित्रपटात दिसणार आहेत.
पाहा ट्रेलर –
https://www.youtube.com/watch?v=eqJ5W4nFnxI&t=141s