मेट्रोच्या लेडीज कोचमध्ये प्रवास करणाऱ्या पुरुष मंडळींना पोलिसांचा दणका; पहा व्हिडीओ

0
6

दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेट्रोच्या लेडीज कोचमध्ये पुरुष मंडळी प्रवास करत असल्याची माहिती मिळताच, पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. लेडीज कोचमध्ये प्रवास करणाऱ्या पुरुषांना महिला पोलिस अधिकाऱ्यांनी चांगलेच फटकारले आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मेट्रोमधील लेडीज कोच कचाकच भरलेली आहे. स्थानकावर थांबलेल्या मेट्रोमधून दोन महिला पोलिस आणि अधिकाऱ्यांनी लेडीज कोचमधून प्रवास करणाऱ्या पुरुषांना बाहेर काढत आहे. त्यानंतर एकेकाला चापट मारताना दिसत आहे. पुरुषांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी त्यांना मारले आहे.

पहा व्हिडीओ: